ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष रंगला..

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चोपडेवाडी ता.पलूस येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.वारकरी वेशात सहभागी झालेल्या बालकांनी भजनाचे गायन केले.ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करीत दिंडीचा आनंद लुटला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप माने, उपाध्यक्षा सौ.जयश्री माने, उपसरपंच अमोल माने आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. सदर उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजेंद्र माळी,शिक्षिका अर्चना माने,सौ. मिनाक्षी तळप यांनी केले.