Sanvad News विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय निश्चित करावे - गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार ;राजेश चौगुले फौंडेशनने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय निश्चित करावे - गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार ;राजेश चौगुले फौंडेशनने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय निश्चित करावे,त्यास कठोर परिश्रमाची जोड देऊन वाचन,लेखनास विशेष महत्व दिल्यास अपेक्षित यश प्राप्त होईल असेप्रतिपादन  वाळवा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले.राजेश चौगुले फौंडेशन,अंकलखोप या सेवाभावी संस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये   विशेष प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख राजेश चौगुले होते.
क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा येथे हा कार्यक्रमसंपन्नझाला.यावेळीअंकलखोप,नागठाणे,संतगाव,सुर्यगाव,भिलवडी,आष्टा,बागणी,बावची,दुधगाव,कवठेपिरान,माळवाडी या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.


ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे विविध क्षेत्रात गगनभरारी घेताना दिसावा हे  ध्येय असून त्यासाठी  सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहणार असल्याचे प्रतिपादन राजेश चौगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी फौंडेशनच्या सचिव सौ.राजश्री चौगुले, विकास सूर्यवंशी,राजेंद्रकुंभार,सौ.मंगल मिरजकर,आप्पासो सकळे,सुभाष मगदूम,संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्य,अंकलेश्वर क्रेडिट सोसायटी अंकलखोप चे सर्व संचालक,सदस्य,पालक  उपस्थित होते.


प्रास्ताविक संस्थेचे व्हा.चेअरमन रघुनाथ गडदे यांनी केले.क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टाचे मुख्याध्यापक चंदनगौडा माळीपाटील   हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन शशिकांत हजारे यांनी केले . क्लेरमॉन्ट स्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख विजय पाटील यांनी आभार मानले.
To Top