आष्टा येथील जिजामाता बालकमंदिर सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ देणारी उपक्रमशील शाळा असल्याचे प्रतिपादन वाळवा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले. जिजामाता बालक मंदिर आष्टा यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
लक्षवेधी दिंडीला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद..
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेतील तसेच विठ्ठल- रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, छत्रपती शिवाजी महाराज आदी संत व महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हातामध्ये पताका, टाळ, चिपळ्या व ढोलकी घेऊन बालवारकरी वारीत तल्लीन झाले. काही चिमुकले घोड्यावरून तर काही बैलगाडीतून वारकरी दिंडीत सहभागी झाले होते.
विद्यालयाच्या प्रांगणात व शिवाजी चौक आष्टा येथे विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला विद्यार्थ्यांची दिंडी जिजामाता बालक मंदिर- शिवाजी चौक व शिराळकर कॉलनी ते विद्यालय या मार्गाने दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांना सुभाष जाधव फौजी,विजय नाना मोरे व श्रीमती मंगल माने यांच्याकडून फराळाचे व खाऊचे वाटप केले.
या सोहळ्यास आष्टा नगरीचे नगरसेवक व गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय मोरे नाना, माजी नगरसेवक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सुनील माने काका, उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त श्री. पोपट झांबरे मामा, आष्टा कला क्रीडा व साहित्य मंडळाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य बाबासाहेब सोलनकर, केंद्रप्रमुख कृष्णनाथ ढोबळे, मराठा ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अजय शिंदे समाजसेवक सुगंध कांबळे,समाजसेवक गणेश मदने तसेच जिजामाता बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व पालकवृंद मोठ्या संख्येने वारकरी दिंडीमध्ये सामील झाले.
स्वागत मुख्याध्यापिका सौ.ज्योती शेटे यांनी केले, प्रास्ताविक दत्तात्रय डफळे यांनी केले.आभार सौ. मेघा मुळीक यांनी मानले.सदर दिंडी यशस्वी करण्यासाठी विजय जाधव, सौ.मंगल पठाणे,सौ. रेश्मा जमादार सौ.अर्चना हाबळे,सौ. शाहीन मुजावर,सौ.मधुमती पाटील,सौ.सुनंदा कोरे व सौ.भोसले मॅडम यांनी परिश्रम घेतले.