भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या हस्ते डॉ . चंद्राताई शेणोलीकर यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले . यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी प्राचार्य , डॉ. दीपक देशपांडे म्हणाले की, ज्यांनी वैद्यकीय सेवा करत असताना भिलवडी शिक्षण संस्थेची उभारणी केली . आणि ती तेवढ्याच नेटाने जीवनाच्या शेवटपर्यंत जपली . गोरगरीब व प्रामुख्याने मुलींना शिक्षण मिळवे म्हणून त्यांनी अंतापर्यत प्रयत्न केले . पूर असो किंवा कोणतीही आपती येवो त्याला न डगमगता त्यांनी आपली वैद्यकिय सेवा पार पाडली . तन , मन , आणि धनाने त्यांनी संस्थेला वाहून घेतले होते . तासगाव भिलवडी असा प्रवास करताना अनेक माणसांची मने जिंकली होती. त्यांनी शिक्षण सेवा व समाज सेवा हेच आपले ध्येय ठेवले होते . म्हणून आज त्यांच्या २७ व्या वर्षीही त्याच आदराने त्यांना आदराजंली केली जाते असे ते म्हणाले .
यावेळी चंद्राताईंच्या समाधीजवळ संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वासराव चितळे व प्रमुख पाहुणे मा. डॉ. शंतनू कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपन करणेत आले .
यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस.डी. कदम यांनी केले . सूत्रसंचालन प्रो. डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रा. आर.एच. भंडारे यांनी मानले .