Sanvad News दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाने केली तीस हजार सीड्स बॉलची निर्मिती.

दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाने केली तीस हजार सीड्स बॉलची निर्मिती.


विज्ञान उपक्रम आणि क्षेत्रभेट अंतर्गत येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सीड्स बॉलची निर्मिती करण्यात आली. माती शेण नारळाचे केसर आणि उंचवाढणार्‍या वृक्षांच्या बिया आंबा जांभूळ करंज एरंड चिंच गुलमोहर कडुलिंब आदी वनस्पतींच्या 1 लाख 68 हजार 348 बिया गोळा केल्या आहेत.विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टीमध्ये या बिया संकलित करण्यास सांगितले होते. सुट्टीचा आनंद द्विगुणित झाला.
    आज विद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मदतीने माती शेण व नारळाचे केसर एकत्र केले. तिन्हींचा गोल गोळा तयार करून प्रत्येक गोळ्यांमध्ये दोन किंवा चार बिया टाकल्या बिया मध्यभागी येतील अशी बॉल्स ची रचना केली.*प्रारंभी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षिका सौ विजया जाधव यांनी प्रात्यक्षिक दाखवले. आणि जवळजवळ 30 हजार 968 सीड्स बॉलची निर्मिती केली.यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांबरोबर श्रमप्रतिष्ठा वाढीस लागेल आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती निर्माण होईल हे मत मांडले.


संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना घर व शालेय परिसर सोडून बाहेर अध्ययन अनुभव देणे गरजेचे असते. दरवर्षी विद्यार्थी बीज संकलन वृक्ष लागवड करतात. परंतु सीड्स बॉल निर्मितीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक अनोखी जाणीव जागृती निर्माण करण्याचे विद्यालयाने चांगले काम केले आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी सांगितले की केवळ बीज लागवड केली तर त्यामधून वृक्षनिर्मिती होईल असे नाही.यामुळे विद्यार्थ्याच्या अंगी संग्रहवृत्ती वाढीस लागेल.


  श्री.सिंकदर मोमिन सर यांनी हल्ली पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे बिया लावल्या तर त्या रुजत नाही त्यामुळे श्रम वाया जातात.त्याकरिता सीड्स बॉलची निर्मिती केली आहे.असे मनोगत मांडले.
सर्वात जास्त 2948 बीज संकलन करणारी विद्यार्थिनी कु.अन्विता सुनिल आरबुने आणि 2938 बीजसंकलन करणारी विद्यार्थिनी कु.चैत्राली चंद्रकांत लोकरे या विद्यार्थिनीचा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साै.सुनंदा मिलिंद जाधव यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
    संस्थेचे अध्यक्ष श्री. जी.बी. सुर्वे सर, सचिव मिलिंद जाधव साहेब,साै.सुनंदा जाधव वहिनी, मुख्याध्यापक ए.एस. कांबळे सर,श्री.एस.बी.मोमिन सर,साै.संजिवनी मोहिते मॅडम,श्री.व्ही.डी.भोये सर ,साै.युगांतरा चव्हाण मॅडम,प्राजक्ता जाधव मॅडम यांनी या सीडस बाॅल्स निर्मितीस उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
To Top