Sanvad News प्रत्येक आईबाबांनी सुजाण पालकत्वाची जबाबदारी पार पाडावी - शरद जाधव यांचे आवाहन ; सांगलीच्या म.के.आठवले विनय मंदिरात पालकांसाठी व्याख्यान

प्रत्येक आईबाबांनी सुजाण पालकत्वाची जबाबदारी पार पाडावी - शरद जाधव यांचे आवाहन ; सांगलीच्या म.के.आठवले विनय मंदिरात पालकांसाठी व्याख्यान

आई-बाबा होण खूप सोपं.पण सुजाण पालक होणं?


सांगली
बालकाच्या सर्वांगिण विकासा मध्ये शिक्षक शाळा यांच्या बरोबरीने सुजाण पालकांची भूमिका महत्वाची आहे.प्रत्येक आई बाबांनी सुजाण पालकत्वाची जबाबदारी पार पाडल्यास बालकाचा निश्चित शारीरिक,मानसिक व भावनिक विकास होईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.
सांगली शिक्षण संस्थेच्या श्री. म. के.आठवले विनय मंदिर सांगली येथे सुजाण पालकत्व या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मुख्याध्यापक राजाराम व्हनखंडे अध्यक्षस्थानी होते.


यावेळी बोलताना शरद जाधव म्हणाले की,प्रत्येक पालक विद्यार्थ्यांवर त्यांच्या अपेक्षांचे ओझे लादत आहेत. त्याऐवजी त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलानुसार फुलण्याची संधी द्यावी. टी.व्ही.मोबाईलचा गरजे इतकाच वापर करून उर्वरित वेळ त्यांच्यासाठी पुस्तके उपलब्ध करून द्या. आई वडिलांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. अभ्यासातल्या विषया बरोबरच मुलांच्या भावनिक विकासाकडे लक्ष द्या,वेळ प्रसंगी बालकाच्या चांगल्या मित्र मैत्रिणीची भूमिका ही पार पाडण्यासाठी आईबाबांनी पुढाकार घ्यावा.घराघरात सुजाण पालकत्व निर्माण झाल्यास निश्चितच सुजाण मुले निर्माण होतील, असे आवाहन उपस्थित पालकांना शरद जाधव यांनी केले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. पालक वर्गांच्या उपस्थिती मध्ये परिपाठ संपन्न झाला. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शालेय उपक्रमांची विषयी,शाळा मॉडेल स्कूल बनविणे,विद्यार्थी गुणवत्ता वाढ आदी विषयावर पालकांशी संवाद साधला. स्वागत, प्रास्ताविक सौ. वर्षा चौगुले यांनी केले.
सूत्रसंचालन स्नेहलता दळवी यांनी केले,तर आभार सौ.अपर्णा कुलकर्णी यांनी मानले.
यावेळी पर्यवेक्षक नानासाहेब खाडे,सौ.नंदिनी सपकाळ यांच्यासह शंभर टक्के पालक   उपस्थित होते. शिक्षक स्नेहल गौंडाजे, श्रीमती सुमन कोळी, सविता पवार, मेघा यादव, सुनिता शिंदे मयुरी चव्हाण, रजनी मेटकरी, गजानन दरूरे, ज्ञानेश्वर पोतदार, वृषाली जोशी, विजया नांदणे,वैशाली वाळवेकर, संभाजी जाधव, अरूण सुतार यांनी संयोजन केले.


To Top