Sanvad News क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टाच्या खेळाडूंची जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी.

क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टाच्या खेळाडूंची जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी.


इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या 'विद्या अकॅडमी ' आणि 'आय एम फिट क्लब' इचलकरंजी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेत क्लेरमॉन्ट स्कूल आष्टा व अंकलखोप या आपल्या भागातील एकमेव सी.बी.एस.ई.स्कूल च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.शिक्षणाबरोबरच सर्व खेळांना  देखील तितकेच महत्व या स्कूलमध्ये दिले जाते.जिद्द,चिकाटी,कठोर परिश्रम व जिंकण्याची लढाऊ वृत्ती मनात असेल तर कोणतेही यश संपादन करणे कठीण नसते हे या खेळाडूंच्या सुवर्णमय कामगिरी ने दिसून येते. या झालेल्या स्पर्धेत ६ अकॅडमी अकादमी आणि  ५ शाळा सहभागी झाल्या होत्या. १००  हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.क्लेरमॉन्ट च्या सर्व चॅम्पियन्स खेळाडूंनी त्यांच्या जबरदस्त कामगिरीने स्वतःला सर्वोत्तम जिम्नॅस्ट म्हणून सिद्ध करून दाखवले.
  स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची  नावे पुढीलप्रमाणे-
६ वर्षाखालील वयोगट मुले
 रुद्र हवलदार (कांस्य पदक)
 ६ वर्षाखालील वयोगट मुली-
 निधा देसाई आणि वैभवलक्ष्मी सुर्यवंशी (रौप्य पदक)
८ वर्षाखालील वयोगट मुले-
 देवराज धनवडे ( द्वितीय क्रमांक- रौप्य पदक)
८ वर्षाखालील वयोगट मुले दुसरी  विजेती टीम चॅम्पियनशिप मिळाली.
 विराज जगनाडे,शौर्य मस्के,जीत हाके,देवराज धनवडे (सर्वांना रौप्य पदक मिळाले)
८ वर्षाखालील वयोगट मुली २ री सांघिक स्पर्धा-
 माही निर्वाणे (रौप्य पदक),
 आराध्या माळीपाटील
 ( रौप्य पदक )
10 वर्षाखालील वयोगट मुले-
 राजवीर सुर्यवंशी-(प्रथम क्रमांक-सुवर्ण पदक )
१० वर्षाखालील वयोगट २ री सांघिक स्पर्धा-
 राजवर्धन सुर्यवंशी,श्रीतेज पाटील, वीरेंद्र सुर्यवंशी, पर्व आडमुठे
 (सर्व रौप्य पदक विजेते)
१० वर्षाखालील वयोगट मुली- २ री सांघिक स्पर्धा-
 आद्या महाजन,शांभवी माने,वेदिका चौगुले,ऋचा मुरके
 (सर्व कांस्यपदक विजेते)

१२ वर्षाखालील वयोगट मुले-
१) श्लोक झांबरे(सर्व फेरीत प्रथम क्रमांक- सुवर्णपदक.तसेच फ्लोअर एक्सरसाईजमध्ये प्रथम क्रमांक - सुवर्णपदक,स्प्रिंग बोर्ड उडीमध्ये प्रथम क्रमांक- सुवर्णपदक
 श्लोक हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ट्रॉफीचा मानकरी ठरला.

 २)विश्वजीत जाधव-
 (सर्व फेरीत द्वितीय क्रमांक -रौप्य पदक,स्प्रिंग बोर्ड उडीमध्ये दुसरा क्रमांक.

 ३)अद्विक पाखले-
  सर्व फेरीत ३ रा क्रमांक -कांस्य पदक,स्प्रिंग बोर्ड उडीमध्ये तिसरा क्रमांक- (कांस्य पदक)

या स्पर्धेतील अष्टपैलू सांघिक विजेतेपद ट्रॉफी चा उपविजेते संघ देखील हेच स्कूल ठरले.
अशाप्रकारे क्लेरमॉन्ट स्कूल च्या खेळाडूंनी एकूण २७ पदके आणि २ ट्रॉफी अशी पदकांची कमाई केली.
         या सर्व यशवंत खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेश चौगुले, मुख्याध्यापक श्री.चंदनगौडा माळीपाटील ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व  सदस्य,क्रीडा शिक्षक प्रतिक इंगवले व अजित सूर्यवंशी,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत,त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शन  या सर्व खेळाडूंना लाभले.शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या आष्टा परिसरातील या एकमेव सी.बी.एस.ई .बोर्ड स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
To Top