भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पर्यावरणाचा होणारा र्हास पाहता वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे या हेतूने इ. सहावी अ मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या पर्यावरण पूरक संदेश देणाऱ्या राख्या शाळेच्या परिसरातील झाडांना बांधून त्या झाडांचे रक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी घेवून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इयत्ता नववी अ मधील विद्यार्थिनी कु. श्रुतिका कुकडे या विद्यार्थिनीने पर्यावरण संवर्धनाची विद्यार्थ्यांना शपथ दिली.
याप्रसंगी पर्यावरण पूरक उपक्रम साजरे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणिव जागृती निर्माण होण्यास मदत होते असे विचार मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देवून मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षिका सौ. राजकुमारी यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव के. डी पाटील, जेष्ठ शिक्षक संजय मोरे, विजय तेली, प्रमोद काकडे, निलेश कुडाळकर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सौ. व्ही. आर चौगुले, एस. व्ही बल्लाळ यांचे मार्गदर्शन लाभले.