Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरूंगवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरूंगवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.



सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरूंगवाडी ता.पलूस येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल(बापू) जाधव यांच्या हस्ते क्रीडांगणावर ध्वजारोहण करण्यात आले.संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव यांच्या हस्ते ध्वज स्तंभाचे पूजन करण्यात आले.
सुनिल (बापू) जाधव यांनी विद्यार्थी व पालकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सैनिकी पॅटर्न निवासी व प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली.विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.देशभक्तीपर गीतांचे गायन केले.भारत माता की जय..वंदे मातरम्... अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी बुरुंगवाडी गावातून प्रभात फेरी काढली.उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. 
स्वाती मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.ज्योती कोकाटे यांनी आभार मानले.यावेळी मुख्याध्यापिका सौ. दिपाली जाधव,प्राचार्यासौ.एस.ए.पाटील,सर्वशिक्षक,पालक,विद्यार्थी,ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


To Top