Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये सामुदायिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये सामुदायिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात


 सिध्द विनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत सामुदायिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला.ग्रामीण कथाकथनकार जयवंत आवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.रमेश हजारे( सर) अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल (बापू) जाधव,कार्यवाह सौ.वानिता जाधव ,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः चे अस्तित्व निर्माण होईल असे कर्तृत्व निर्माण करावे असे आवाहन कथाकथनकार जयवंत आवटे यांनी केले.त्यांनी सांगितलेला मंजुळा या कथेस उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
रमेश हजारे म्हणाले की,शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.यावेळी बोलताना सुनिल(बापू) जाधव म्हणाले की,विद्यार्थी वर्गाने अभ्यासाला परिश्रम व व्यावहारिक ज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.




यावेळी ग्रामीण साहित्यिक विजय जाधव,ब्रह्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी राजमाने,श्रीकांत माने आदी मान्यवरांसह सर्व पालक,विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थी व शिक्षकांनी गायिलेल्या गीतांना उपस्थितांनी उस्फुर्त अशी दाद दिली.
स्वाती पाटील यांनी प्रास्ताविक केले.सौ.दिपाली जाधव यांनी स्वागत केले.रेश्मा तांबोळी व अर्चना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.सीमा खोत यांनी आभार मानले.
To Top