Sanvad News सेकंडरी स्कूल भिलवडी प्रशालेस स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान; जिल्हास्तरीय यशाबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव.

सेकंडरी स्कूल भिलवडी प्रशालेस स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान; जिल्हास्तरीय यशाबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव.


सन 2021- 22 या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय या उपक्रमात भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी या विद्यालयाची जिल्हास्तरावर सर्वंकष प्रकारात पहिल्या आठ क्रमांका मध्ये अभिनंदनीय निवड झाली. स्वच्छ विद्यालय पुरस्काराचे बक्षीस वितरण बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज, जिल्हा- सांगली येथे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

पुरस्कार मानांकनात विद्यालयाला 95 टक्के गुण प्राप्त होऊन उत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली. गुणांकनात पाणीपुरवठा 90 गुण, देखभाल दुरुस्ती 95 गुण, कोव्हिड नियमांचे पालन 100 गुण, हात धुणे व स्वच्छता 100 गुण, वर्तन बदल, इमारत देखभाल 100 गुण असे गुण प्राप्त झाले. 

पुरस्कार समारंभास जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डुडी, प्राथमिक शिक्षणाधिकारी  मोहन गायकवाड उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षरोप, प्रशस्तीपत्र देऊन शाळेस गौरवण्यात आले.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक संभाजी माने, शिक्षक प्रतिनिधी खंडेराव पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख गुंडाजी साळुंखे व लेखनिक कुंदन मोंढे यांनी पुरस्कार स्वीकारला. विद्यालयाला पुरस्कार मिळाल्याबद्दल भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, सचिव मानसिंग हाके, विश्वस्त, संचालक यांनी अभिनंदन केले. संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे अधिकारी, शिक्षक, सेवक, विद्यार्थी, पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यालयाला स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाला याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




To Top