जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धनगाव च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी संदीप यादव यांची तर उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा साळुंखे यांची निवड करण्यात आली.
सदस्य पदी दिलीप मोहिते, मधुकर कोळी,सौ.समिधा भोसले,सौ.मनीषा साळुंखे,सौ.विद्या साळुंखे, शिक्षक प्रतिनिधी सौ.सीमा चौगुले,स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी सतपाल साळुंखे,शिक्षण तज्ञ उदय साळुंखे, उपेक्षित घटक प्रतिनिधी सुधाकर रोकडे,संतोष मोटकट्टे, विद्यार्थी प्रतिनिधी चि.दिग्विजय साळुंखे,कु. अनुष्का साळुंखे यांची निवड झाली. सचिवपदी मुख्याध्यापक संजय डोंगरे यांची निवड झाली.
शाळेचा सर्वांगीण विकास व नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्नशील राहू असे मनोगत अध्यक्ष संदिप यादव यांनी व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती पलूस चे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे,विषय तज्ञअरुण कोळी,जयकर कुटे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
अजित जाधव यांनी स्वागत केले तर विजय धेंडे यांनी आभार मानले.उपस्थित पालकांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.