भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय पोषण आहार मास अंतर्गत पाककला स्पर्धा संपन्न झाल्या.तांदळापासून तयार केलेली पौष्टिक पाककृती हा विषय देण्यात आला होता.या स्पर्धेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांनी सहभाग घेतला.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...
प्रथम क्रमांक - सौ.प्रियांका विशाल शेटे,
द्वितीय क्रमांक - सौ. प्रिती विशाल शेटे,
तृतीय क्रमांक - सौ.स्वाती दत्तात्रय टकले
उत्तेजनार्थ क्रमांक -
प्रथम क्रमांक - सौ.अर्चना विजय येसुगडे,
द्वितीय क्रमांक - सौ.वंदना चौगोंडा मगदूम,
तृतीय क्रमांक - सौ. तस्मीया साबीर सुतार
सर्व सहभागी स्पर्धकांनी मुलांच्या आरोग्यासाठी आपली पाककृती कशी उपयुक्त आहे त्याचे महत्त्व पटवून दिले.
प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,प्रा.अमृता पाटील( सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी) यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. मे.बी.जी.चितळे डेअरी येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सी.व्ही.कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेतील सहभागी माता पालकांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सौ.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले.संजय पाटील यांनी आभार मानले.
शालेय पोषण आहार विभाग प्रमुख शरद जाधव,किरण गुरव,पूजा गुरव,रूक्साना शेख,प्रियांका आंबोळे आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संयोजन केले.