Sanvad News सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक तीन वर्षे हक्काच्या फरक बिलापासून वंचित; शिक्षक परिषदेने सुरू केला पाठपुरावा.

सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक तीन वर्षे हक्काच्या फरक बिलापासून वंचित; शिक्षक परिषदेने सुरू केला पाठपुरावा.


कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक गेली दोन ते तीन वर्षे हक्काच्या फरक बिलापासून वंचित राहिले आहेत.याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (खाजगी प्राथमिक ) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे समक्ष भेट देऊन लेखी निवेदन दिले.आर.जी.चौगुले शिक्षण उपनिरीक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांनी निवेदनाचा स्वीकार केला.यावेळी संघटनेचे मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव,नितीन बदडे,युवराज साठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 ह्या प्रकारची बिले आहेत थकीत....

१ ) वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील..
२ ) मुख्याध्यापक पदोन्नती फरक बील...
३ ) अप्रशिक्षीत शिक्षण सेवक फरक बील...
४ )नियमित वेतन फरक बील...
५ )रजा रोखीकरण देयक...
६ )रजा कालावधी मधील वेतन...
७ ) सहा. शिक्षक पदोन्नती नियमित फरक..
८ ) सहावा वेतन आयोग फरक बील..

  सांगली जिल्हयातील खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित फरक बीले गेली दोन तीन वर्षांपासून थकीत आहेत. वेतनपथक सांगली यांनी  विहित नमुन्यात सर्व बिले उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे सादर केली असताना सर्वच बीलांना त्रुटी लावून त्रुटी पुर्तता करण्याच्या कारणाने बीले पास केली नाहीत.  गेल्या मार्चला ४ते ५ बिलांनाच मंजूरी देण्यात आली आहे.
उपसंचालक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालय पुणे येथे बीले किंवा त्याबसबत  कोणताही प्रस्ताव  सादर केला नाही.मात्र विचारणा केली असता बीले पुणे कार्यालयास पाठवली होती पण वेळेत सादर न केल्याने नामंजूर झाली अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.  मार्च २०२२ रोजी त्रुटी लागलेली बीले  वेतनपथक सांगली यांना पाठविण्यात आली नाहीत.
  गेली ७ ते ८ महिने झाली तरी यावर कोणताच ठोस निर्णय उपसंचालक कार्यालयाने घेतलेला दिसत नाही.
बीले प्रलंबीत असल्याचे शेरे सुद्धा विश्वास न बसण्यासारखे दिले आहेत... शाळा स्तरावर विलंब, मान्यता उशीरा मिळाल्याने, मान्यता घेण्यास विलंब असे अनेक हास्यास्पद शेरे देण्यात आले आहेत.यापूर्वी 
किमान दोनतीन वेळा संबंधितशिक्षक,मुख्याध्यापकांनी
 समक्ष कार्यालयात भेटून,लेखी पत्र व्यवहार 
करून त्रुटींची पूर्तता केली आहे.  कार्यालया च्या मागणीनुसार तीनवेळा त्रुटी पुर्तता करुन प्रस्ताव दिले तरी देखील  त्रुटी कशी काय लागते.कागद गहाळ केले जातात का? असा प्रश्न निर्माण होतोय.
सांगली पे युनिटचे अधिकारी यांच्याशीही संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की नोव्हेंबर महिन्यात १ते ५ तारखेस कॅम्प लावून बीलांची त्रुटी पुर्तता करून घेतो असे सांगण्यात आले.उपसंचालक कार्यालय यांनी सांगली जिल्हयातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षाच्या फंडाच्या लेखाचिठ्ठी त्वरित देणे संदर्भातही  पत्रव्यवहार करण्यात आला आहे.वरिष्ठ लिपिक चंद्रशेखर पाटील यांनी   नोव्हेंबर महिन्यात सर्वच बिले देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
To Top