Sanvad News पाल पंचक्रोशीत विद्यार्थी व पालकांची अभिनव दिवाळी; फटाक्याच्या खर्चातून शाळेस देणगी.

पाल पंचक्रोशीत विद्यार्थी व पालकांची अभिनव दिवाळी; फटाक्याच्या खर्चातून शाळेस देणगी.



ई-स्कूल टाईम्स प्रतिनिधी पाल
 फटाके मुक्त व प्रदूषण  मुक्त दिवाळी साजरी करून त्या खर्चातून लेकरांच्या भवितव्यासाठी धडपडणाऱ्या शाळेस देणगी देऊन सामजापुढे आदर्शाचा नवीन पायंडा निर्माण केला आहे.पाल   येथील  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाल ता. कराड जि. सातारा येथील  माजी विद्यार्थी व इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत संकलित केलेल्या रक्कमेतून मुलांसाठी अत्यावश्यक अशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
 विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. शिवाजी पाचुपते यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ इयत्ता पाचवीचा वर्ग डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून एलसीडी टीव्ही भेट दिला.वर्गशिक्षक कलाशिक्षक  विजय शिंगण यांच्या संकल्पनेतून एक आदर्शवत डिजिटल वर्ग करण्याचे कामकाज सुरू आहे. ग्रामस्थांनी विद्यालया साठी फरशी व डिजिटल बॅनर ब्लॅक बोर्ड या वस्तू भेट दिल्या. श्री.वैभव यादव,श्री.शिवाजी पाटील, श्री.अविनाश गोरे,श्री.प्रमोद चव्हाण, श्री.महादेव गोरे,श्री.संदीप माने,श्री.सचिन फाळके,श्री.महेश खोचरे,श्री.संदीप कदम,श्री.महेश नलवडे राहणार पाल यांनी आपले पाल्य शिक्षण घेत असलेल्या पाचवीच्या वर्गखोलीस फरशी बसवून दिली. सदर पालकांनी आपल्या पाल्यांचा दिवाळीतील फटाक्यांचा खर्च वर्गातील फरशी बसवण्याच्या कामी आणून विधायक कामाचा अनोखा परिचय संपूर्ण पंचक्रोशीस करून दिला.२५ हजार रुपये खर्च करून दीपावलीच्या सुट्टीमध्ये वर्गखोलीत फरशी बसविण्यात आली. पालकांनी केलेल्या अनोख्या सहकार्याचे संस्था पातळीवरून प्रा.श्री.राजेंद्र शेजवळ, सहसचिव प्रशासन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व प्राचार्य श्री.एस.आर. पाचुपते आणि पंचक्रोशीतून विविध स्तरावरून कौतुक होत आहे.


To Top