Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे संविधान दिन साजरा.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे संविधान दिन साजरा.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या हस्ते राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रगती भोसले यांनी संविधान दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.अर्चना येसुगडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये म्हटली.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ. छाया गायकवाड,संजय पाटील,विठ्ठल खुटाण,शरद जाधव,पूजा गुरव,सफुरा मगदूम,स्वाती पाटील,सारिका कांबळे,मनिषा रांजणे,प्रियांका आंबोळे, रुकैय्या पटेल,रोहिणी माने,आश्र्विनी कोष्टी आदी उपस्थित होते.



To Top