सुसंस्काराची शिदोरी जीवन सुंदर बनवते.विद्यार्थ्यांच्या शालेय विकासात शिक्षकांची व पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुले संस्कारक्षम असतात, चांगले संस्कार होणेसाठी शिक्षकांनी पालकांनी जागरूक असायला हवे असे प्रतिपादन पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांनी पलूस येथे केले.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात द्वितीय सत्रातील शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज आवटे दुबई, संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे,सचिव जयंतीलाल शहा,मुख्याध्यापक टी.जे.करांडे , सर्व शिक्षक ,पालक उपस्थित होते.
अतिशय सुंदर अशा स्वागत गीतानंतर परीक्षा विभाग प्रमुख ए.जे सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. डी.चोपडे यांनी या शैक्षणिक विविध उपक्रम ,स्पर्धा, परीक्षा नियोजन, सहल स्नेहसंमेलन संबंधित सूचना दिल्या.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज आवटे,संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, सचिव जयंतीलाल शहा ,मुख्याध्यापक टी.जे करांडे यांनी आपले मनोगतातून सर्व पालकांना ,शिक्षकांना मार्गदर्शन केले.सर्व पालकांच्या शंकांचे निरसन केले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज आवटे म्हणाले की मी आज जो घडलो ते याच विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयामुळे घडलो. हे विद्यालय उत्तम दर्जाचे चांगले विद्वान घडवण्याची ही एक फॅक्टरीच आहे असे सांगितले. पालकांनी एक तरी परदेशी भाषा आपल्या मुलांना शिकवावी असे आवाहन पालकांना केले.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांची संगत महत्त्वाची आहे. पालकांनी नेहमी शिक्षकांच्या संपर्कात रहावे.संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सचिव जयंतीलाल शहा म्हणाले चालू शैक्षणिक वर्ष गुणवत्ता विकास वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आनंददायी शिक्षण पद्धती ,करिअर मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे माहिती तंत्रज्ञान युगात नवनवीन क्षेत्रात वाढती स्पर्धा आहे मुलांची आवड बघून शिक्षण दिले पाहिजे,एकही विद्यार्थी अप्रगत रहाणार नाही यासाठी आपण सर्वानी सजग असायला हवे.
मुख्याध्यापक टी.जे करांडे सर म्हणाले यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा जीवनात खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांचा कल आणि गुणवत्ता बघून निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत अमलाग्र बदल होत आहेत मूल्यमापन पद्धती बदलत आहेत याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे असे सांगितले
यावेळी सर्व शिक्षक पालक उपस्थित होते. सूञसंचालन प्रा बळीराम पोतदार यांनी आभार सौ प्रज्ञा बिराज मानले....