Sanvad News सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी पुरेसे अनुदान वेळेत मिळावे ; शिक्षक संघाचे शिक्षण आयुक्तांना साकडे

सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी पुरेसे अनुदान वेळेत मिळावे ; शिक्षक संघाचे शिक्षण आयुक्तांना साकडे


सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी चे अनुदान सातत्याने कमी प्राप्त होत असून त्यामुळे अनेक तालुके वगळून वेतन वितरित करावे लागते त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतनासाठीचे अनुदान पुरेसे व वेळेत प्राप्त व्हावे यासाठी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त मा श्री सुरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शिष्टमंडळामध्ये सांगली शिक्षक संघाचे जिल्ह्याध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, सुधाकर पाटील, शामगोंडा पाटील, महादेव हेगडे, संतोष जगताप आदी उपस्थित  होते.
 निवेदनामध्ये पुढे शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी व शिक्षकांच्या वैद्यकीय देयकांसाठी अनुदान देण्यात यावे तसेच सध्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया बदली पोर्टलद्वारे सुरू असून ७ एप्रिल २०२१ च्या बदली शासन आदेशानुसारच बदल्या व्हाव्यात. त्यासाठी संवर्ग एक व दोनचा लाभ पूर्वी न घेतलेल्या शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण होण्याची अट न घालता त्यांना त्याचा लाभ मिळावा. संवर्ग एक मधील शिक्षकांना रिक्त जागेसह बदली पात्र शिक्षकांच्या जागी बदली मागता यावी. तसेच संवर्ग एक व दोनची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अनेक शिक्षक बदलीपात्र असूनही त्यांची बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये नावे आलेली नाहीत या प्रकारच्या सुधारणा बदली पोर्टलमध्ये कराव्यात, त्यानंतरच बदल्या कराव्यात.
          निवेदनामध्ये पुढे अनेक जिल्हा परिषदांना शिक्षकांच्या वेतनासाठीचे अनुदान सातत्याने कमी येत असून त्याबाबत अनेक जिल्ह्यांमध्ये काही तालुके वगळून वेतन वितरित करावे लागत असल्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेमध्ये आलेल्या शिक्षकांची अंशदान पेन्शन योजनेमध्ये झालेली कपात भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करण्याबाबतचे प्रस्ताव गेल्या चार ते पाच वर्षापासून उपसंचालक कार्यालयाकडे कार्यवाही शिवाय पडून आहेत त्या संदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सूचना होऊन सदरच्या कपात केलेल्या रक्कम शिक्षकांच्या भविषय निर्वाह निधी खाती जमा कराव्यात. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनावर आहेत.
         
To Top