पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचा अभ्यास दौरा वाई - पाचगणी रायगड - महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे , उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा संचालक सुनिल रावळ विदयालयाचे मुख्याध्यापक टी. जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौराचे आयोजन केले होते.
गुरुवारी वाई येथील महागणपतीचे दर्शन घेऊन सर्वानी पांचगणी टेबलं लँड, ची माहिती घेतली.त्यानंतर सर्व विद्यार्थी प्रतापगड या किल्ल्यावर गेले. प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती घेतली. रायरेश्वराच्या साक्षीने शिवाजी महाराजांनी निवडक सहकाऱ्यांसमवेत स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती. सर्व मावळ्यांचं साक्षीने स्वराज्य स्थापन केले. रायगडावर विदयालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रदूषणमुक्त भारत बनवण्याची व पर्यावरण संवर्धन करण्याची तसेच प्लास्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. ही शपथ इतिहास शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली .
अभ्यास दौऱ्यात सहल प्रमुख बाळासाहेब चोपडे,मिलिंद शिरतोडे ,जेष्ट शिक्षक ए.जे. सावंत, बी. एन.पोतदार,जी. एस.पाटील,एस. एस. पुदाले,सौ .ए.ए.कुलकर्णी, सौ.एस.आर.साळुंखे, सर्व शिक्षक ,विद्यार्थी सहभागी झाले होते .संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा संचालक सुनिल रावळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.