Sanvad News तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे यश.२३ विद्यार्थ्यांनी मिळवली पदके

तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे यश.२३ विद्यार्थ्यांनी मिळवली पदके

 

विटा: येथील विटा हायस्कूल विटा येथे पार पडलेल्या कराटे क्रीडा स्पर्धेत सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत वेगवेगळ्या वजन गटात ९ मुलांनी सुवर्णपदक, ९ मुलांनी रौप्य तर ५ मुलांनी  कास्यपदक मिळवले. 
सुवर्णपदक विजेते श्रद्धा निवास रावताळे , आर्यन विनोद बाबर , ईशा विनायक साळुंखे ,  तनवी गणेश भिंगारदेवे, मुबाशिरा अफाक खान, अभी नागराज अरसिनगेरी, ऋषिकेश भीमराव घाडगे, धनंजय सिद्धाप्पा हळळी, सार्थक पिराजी जगदाळे.
        रौप्य पदक विजेते शरयू योगेश्वर मेटकरी,सानिका गोरख काटकर, तनय रणजीत तारळेकर , ऋतुजा संतोष महाडीक, ओमकार अर्जुन देवकर, आदित्य संतोष क्षीरसागर, आदित्य अरसीनगेरी,  यासीन फिरोज राज, कुणाल विजय जानकर.
           कास्यपदक विजेते बुशरा असलम मुजावर , काजल विजय जानकर, अनुष्का पंढरीनाथ पवार, राजलक्ष्मी धनंजय फाळके, अनुष्का सतीश जाधव.
        सुवर्णपदक विजेत्या मुलांची जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. त्याना  मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक असिफ मुजावर यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी ,अध्यक्षा रेखा शेंडगे,प्राचार्या वैशाली कोळेकर , कार्यवाहक योगेश्वर मेटकरी , सर्व शिक्षक व पालकयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
To Top