पलूस
योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया आहे. शरीर आणि मन निरोगी बनवण्यासाठी योग साधना अत्यंत आवश्यक आहेयोगामुळे शारीरिक, मानसिक संतुलन राहते. .निरोगी जीवनासाठी योगा, ध्यान महत्वाचे आहे असे प्रतिपादन श्री. श्री.ऍडव्हान्सड योग प्रशिक्षिक श्रीकांत नाझरे यांनी केले.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात शनिवारी विद्यार्थ्यांना योग प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक टी.जे.करांडे, क्रीडाशिक्षक एस.डी सावंत,सर्व शिक्षक , शिक्षिका,पालक उपस्थित होते..
योगशिक्षक श्रीकांत नाझरे यांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायाम ध्यानाचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार योगाचे महत्व सांगितले. कु.धनश्री शिंदे तनिष्का सुतार समीक्षा शिंदे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
श्रीकांत नाझरे म्हणाले प्रत्येकाने दिवसातून किमान एक तास दरम्यान योगासाठी दिला तर व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहण्यास निश्चितच मदत होते.. योगामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक संतुलन राखता येते. योगाच्या नियमित सरावाने प्रतिकारशक्ती आणि आपल्या शरीराची लवचिकता देखील विकसित करू शकते. चांगल्या प्रतिकारशक्तीसह आपण एक चांगले आणि रोगमुक्त जीवन जगू शकतो. योगामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते असे सांगितले. प्रास्ताविक एस. एस.पुदाले, आभार बी. डी. चोपडे यांनी मानले.