कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस के पाटील यांनी केले .तर पाहुण्यांची ओळख प्रा एस के काशीद यांनी केली . कथाकार हिंमत पाटील म्हणाले , विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वतावरणातूनही खूप काही चांगले शिकता येते .ते घेण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जपावी व आपला विकास साधावा. यावेळी हिम्मत पाटील यांनी 'माती' नावाची विनोदी ग्रामीण कथा सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.गतवर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष पी. डी. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्याचा आदर्श घेऊन स्वतः त्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न करावा . कार्यक्रमास संस्थेचे संचालक रणजित पवार ,कवी रमजान मुल्ला, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या संचालिका वंदना बहेनजी, प्रकाश पाटील, ब्रम्हदेव पाटील, प्रकाश पाटील, दिनकर पाटील, भरत पाटील,शंकर पाटील, कृष्णदेव पाटील, अरुण रसाळ, प्रसाद गुंडणके, रामदास गुरव , कृष्णा सातपुते,यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सहदेव खोत यांनी सूत्रसंचालन तर प्रा सौ एम एच करडे यांनी आभार मानले.
फोटो - कणदूर येथील दत्त विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना कथाकार हिम्मत पाटील.