आदर्श बालमंदिर ,विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव,आदर्श माध्यमिक विद्यालय बुधगाव मध्ये मोठ्या उत्साहाने क्रीडा महोत्सव सुरू झाला.
या स्पर्धेमध्ये सांघिक खेळ पाच प्रकारचे व वैयक्तिक सामने पंधरा प्रकारचे मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू कु, तनवीन तांबोळी शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव चे मुख्याध्यापक श्री ए,व्ही,कांबळे यांनी मुलांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपमुख्याध्यापक श्री युनुस जमादार सर यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार आदर्श बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका शरयू कदम यांनी मानले शाळेचे क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख श्री अनिल उमराणी ,राजेंद्र दाभाडे सौ शुभांगी पोळ यांनी स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर रित्या केले आहे या यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ.बी एम पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.