Sanvad News जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश.

जिल्हास्तरीय स्पर्धेत पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयास उल्लेखनीय यश मिळाले. जिल्हा स्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.14 वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या गटात कु. रिया अजित भोसले इयत्ता आठवी हिने 42 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला.कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.


17 वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात सहभागी खेळाडू निखिल भागवत हर्षद हराळे विघ्नेश पाटील स्मरण हराळे सोहम गिड्डे सुभान मुलानी वरद बुचडे गोलकीपर आयन मुल्ला गौरव सदामते पुष्कराज सिसाळ राकेश रूपटक्के विघ्नेश मोकाशी श्रवण भोसले या खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन केले व कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली 14 वर्षाखालील गटात सार्थक हराळे आयुष चौगुले ओम शिंदे सक्षम चंद आदित्य होळकर ओम भोसले श्रेयश जाधव संस्कार कदम शुभम गोंदील उत्तम खेळ केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी करांडे यांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण क्रीडा शिक्षक संदीप सावंत, उदय भोरे यांचे मिळाले संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा, सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
To Top