Sanvad News निस्वार्थीपणे देशसेवा करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - माजी न्यायमूर्ती जे. एस.माळी; खंडोबाचीवाडीत बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर

निस्वार्थीपणे देशसेवा करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - माजी न्यायमूर्ती जे. एस.माळी; खंडोबाचीवाडीत बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर



भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे " विशेष श्रमसंस्कार शिबीरास खंडोबाचीवाडी ता पलूस येथे प्रारंभ करण्यात आला. माजी न्यायमुर्ती जे.एस. माळी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व  भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुनिल वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ करण्यात आला.
श्रमसंस्कार शिबीरे हा एक संस्कार असून निःस्वार्थी वृत्त्तीने देशसेवा करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जे. एस.माळी यांनी केले.
डॉ.सुनिल वाळवेकर म्हणाले की, नॉट मी बट यू हे राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन गावाची सेवा करा.तरुणाईच्या पुढाकाराने ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने विकास शक्य आहे.
खंडोबाचीवाडी  गावच्या वतीने चितळे महाविद्यालयाच्या शिबिरास सर्वोतोपरी सहकार्यकरू असे मनोगत सरपंच धनंजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे ,खंडोबावाडीचे सरपंच धनंजय गायकवाड,उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ.अश्विनी मदने सदस्य  प्रताप शिंदे,सर्जेराव शिंदे आदींसह विद्यार्थी,नागरिक उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. व्ही.एस.विनोदकर यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. सुरेश शिंदे यांनी केले, तर आभार प्रा.सौ. एन एस. गायकवाड यांनी मानले .
To Top