Sanvad News ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर येथे इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी साठी मार्गदर्शन वर्ग संपन्न.

ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर येथे इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी साठी मार्गदर्शन वर्ग संपन्न.


ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर ता.पलूस येथे दहावीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पलूस पंचायत समिती समन्वयक वर्षा पवार. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सुनील पुदाले, मुख्याध्यापक ए. सी.राजमाने सर , पी. बी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
         यावेळी बोलताना पंचायत समिती समन्वयक वर्षा पवार म्हणाल्या की, इयत्ता दहावीचे वर्ष आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून शरीर आणि मन यांची काळजी घ्यावी. इथूनच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक निश्चित दिशा प्राप्त होत असते विद्यार्थ्यानी आयुष्यात उत्तम ध्येय ठेवल्यास यशस्वी होऊ शकता. विद्यार्थ्यांचा आहार विहार, सकारात्मक विचार याबाबत मार्गदर्शन केले.
          यावेळी बोलताना सुनील पुदाले म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी. परीक्षेला सामोरे जाताना ताण तणाव व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. लेखन वाचन यातील गती प्राप्त करून यश कसे संपादन करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधता आला. 
      यावेळी ए. टी.गुरव ,एस. एन.कदम ,पी. एस.कांबळे , ए. ए.जाधव ,ए. ए.तावदर ,सौं.एस. एस.निकम , एस. आर.पावरा , एस.टी.मोरे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनीं उपस्थित होते.
To Top