Sanvad News सांगली जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेत धनश्री पाटील विजेती;भिलवडी येथील पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे आयोजन

सांगली जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेत धनश्री पाटील विजेती;भिलवडी येथील पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे आयोजन


भिलवडी ता.पलूस येथील पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतीने मराठी राज भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थी काव्यलेखन स्पर्धेमध्ये क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील विद्यालय सोनी या शाळेची विद्यार्थिनी कुमारी धनश्री विजय पाटील हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी स्पर्धेचा निकाल प्रसिद्धीपत्रकद्वारे जाहीर केला.
 इयत्ता सातवी ते नववी या वयोगटातील जिल्ह्यातून  ३५ विद्यार्थी कवी स्पर्धेत सहभागी झाले.

 स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.

द्वितीय क्रमांक – कु.आरती नारायण पुजारी 
(श्रीमती व.दे.गर्ल्स हायस्कूल आटपाडी),
तृतीय क्रमांक–कु.श्रावणी संतोष कांबळे 
(श्रीमती कोंडाबाई साळुंखे विद्यालय हरिपूर),
उत्तेजनार्थ क्रमांक–
कु.संध्या सागर (आटपाडी),
कु.वर्षा काकडे (देशिंग),कु.आसावरी माळी(नांदणी)

स्पर्धेसाठी माझे आईबाबा,माझी मायबोली,आणि झाडबोलते माझ्याशी हे विषय देण्यात आले होते.स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ बाल साहित्यिक ह.रा.जोशी व जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मराठी राजभाषा गौरवदिनी २७ फेब्रूवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता ज्ञानदीप वाचनालय,वसंतदादा कारखाना गेटसमोर शातीनिकेतन रोड सांगली येथे संपन्न होणार आहे. यावेळी विद्यार्थी व जिल्ह्यातील मान्यवर कवींचे कवी समेलन संपन्न होणार आहे.या बक्षीस वितरण समारंभास सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी व जिल्हाय्तील कवींनीउपस्थित राहावे असे आवाहन काव्यलेखन स्पर्धेचे संयोजक व संस्कार केंद्र प्रमुख सुभाष कवडे यांनी केले आहे.
To Top