भिलवडी
मे.बी.जी.चितळे डेअरीचे संचालक उद्योजक मकरंद चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांची देणगी दिली.आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यास देणगी देण्याची स्व.काकासाहेब चितळे यांनी निर्माण केलेली परंपरा चितळे परिवाराने सातत्याने सुरू ठेवली आहे.शिक्षण क्षेत्रात सेवाभावी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या भिलवडी शिक्षण संस्थेस अत्यावश्यक अशा भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी या देणगीचा उपयोग करण्यात यावा असे मनोगत मकरंद चितळे यांनी व्यक्त केले.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी या देणगीचा स्वीकार केला.यावेळी सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी,सहसचिव के. डी.पाटील उपस्थित होते.या देणगी बद्दल मकरंद चितळे यांचा भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.