Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.



भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रारंभी राष्ट्रगीत व राज्य गीताचे गायन करण्यात आले.
सौ. रोहिणी माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
पारंपारिक वेशभूषेत उपस्थित विद्यार्थ्यांनी कविता,भाषणे,पोवाडे,देशभक्तीपर गीते,लोकनृत्य आदींचे सादरीकरण केले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.प्रगती भोसले यांनी केले.यावेळी सौ. छाया गायकवाड, संध्याराणी मोरे,संजय पाटील,विठ्ठल खुटाण,शरद जाधव,सफुरा पठाण,स्वाती भोळे, रुकैय्या पटेल,आश्र्विनी कोष्टी आदींसह विद्यार्थी,पालक उपस्थित होते.


To Top