सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे..
प्रथम क्रमांक -
कु.अनुष्का सचिन जाधव (९५ %)
द्वितीय क्रमांक -
मंथन महेश साळुंखे (९४.८० %)
तृतीय क्रमांक -
कु.अनुजा राजेश कोळी (९२.८०%)
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष
सुनिल (बापू) जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी.आर.पाटील,अर्चना शिंदे,अश्विनी कोळी,संपतराव पवार,प्रकाश जाधव,नीलम कुरणे,धनश्री देशमुख, प्राचार्या एस. ए.पाटील,मुख्याध्यापिका दिपाली जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा निर्माण केली असून सर्व पालक वर्गामधून अभिनंदन होत आहे.