पलूस प्रतिनिधी
आनंददायी शिक्षण काळाची गरज आहे मुलांमधील कौशल्याला पालकांनी प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या शैक्षणिक मानसिक भावनिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यावे भविष्यात विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार आहे ,त्यांना बालपण मजेत जगण्यासाठी पोषक वातावरण आपण दिले पाहिजे असे प्रतिपादन पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.निर्मला राशिनकर यांनी केले.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु. शिक्षण संस्था,पलुस संचलित माधवराव परांजपे प्राथामिक विद्यामंदिरात नवीन सेमी इंग्रजी विभागाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.निर्मला राशिनकर , शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे , उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतराव शहा, मुख्याध्यापक टी.जे करांडे,प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.अलका बागल ,सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक उपस्थित होते.
अध्यक्ष उदय परांजपे म्हणाले संस्थेच्या वतीने सर्व सोयी सुविधा दिलेल्या आहेत सध्या इमारतीचे रंगकाम पूर्ण झाले आहे. सुंदर प्रसन्न वातावरणामध्ये सेमी इंग्रजी विभागाचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे.
यावेळी शैक्षणिक संकुलाचे सचिव जयंतीलाल शहा, मुख्याध्यापक टी.जे करांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सर्वांचे स्वागत - प्रास्ताविक मुख्याध्यापक टी.जे.करांडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पोतदार यांनी, आभार प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. अलका बागल यांनी मांनले.