मुंबई प्रतिनिधी
२०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -२०२२/प्र. क्र.२१६/एस.डी.-४, दि.८ मार्च २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश करण्यात आला आहे.इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गांसाठी एकात्मिक पद्धतीने चार भागात पथदर्शी स्वरूपात पुस्तके प्रकाशित करून ती १५ जून २०२३ रोजी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.पाठ्यपुस्तकातील वाह्यांच्या पानांचा नेमका कशा पद्धतीने वापर करावयाचा यासाठी शिक्षकांसाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.