आमणापूर प्रतिनिधी.
क्रांती उद्योग समुहाच्या माध्यमातून आमणापूर जिल्हा परिषद केंद्र शाळेसाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मराठी शाळा टिकणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अरुण आण्णा लाड यांनी केले.
आमणापूर येथील जि.प. मराठी शाळा नं १ व २ या केंद्र शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.२०२३ या नवीन शैक्षणिक वर्षात आमणापूर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना आ.अरूण लाड यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, गणवेश व पुष्पगुच्छ देवून नवागताचे स्वागत करण्यात आले.आमणापूर जि.प.शाळेत १३ वर्षे उत्तम अध्यापन करणा-या विद्यार्थी प्रिय शिक्षिका ज्योती पाटील यांचा आ.अरूण लाड यांनी सत्कार केला.
यापुढे बोलताना अरुण आण्णा लाड म्हणाले की, गावागावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूलची संकल्पना आणली. यातूनच शाळचे रूपडे पालटले. इंग्रजी माध्यमाकडे पळणाऱ्या मुलांचा कल पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळला पाहिजे. यासाठी सर्व शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाची खरी जडणघडण ही जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असते.
गटशिक्षणाधीकारी प्रकाश कांबळे, सरपंच विश्वनाथ सुर्यवंशी, सरपंच आकाराम पाटील, मोहन घाडगे, पोपट फडतरे आप्पासाहेब कोरे, संदीप नाझरे, धनंजय भोळे, अरुण कोळी, वर्षा पवार, क्रांती समुहातील पदाधिकारी, ग्रा. पं. पदाधिकारी, शाळा कमिटी पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक सुनिता मोकाशी ,कविता कांबळे, मनिषा रावळ, ज्योती पाटील ,सुधा पाटील,सारिका गंभीर, सुनिता कर्पे, असिफा नदाफ यांनी केले. प्रास्ताविक सुरेश खारकांडे यांनी तर आभार संदीप कांबळे यांनी मानले.