Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा.

खाजगी मराठी प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा.




भिलवडी प्रतिनिधी
अमृतमहोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा व सेमी इंग्लिश स्कूल भिलवडी या विद्यालयात  आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.


भिलवडी शिक्षण संस्थेचे  विश्वस्त डॉ.सुहास जोशी,विश्वदर्शन योग केंद्र सांगली येथील योग प्रशिक्षिका रुपाली पाटील,रंजना उंबरकर यांनी योगदानाची प्रात्यक्षिके सादर केली.


भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे ,सचिव मानसिंग हाके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद व सादर केलेली योगासने पाहून प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी स्वागत केले.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.संजय पाटील यांनी आभार मानले.सेमी इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा पवार,सौ. संध्याराणी मोरे आदींसह सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.


To Top