शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू दळवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना आ मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तहसीलदार श्यामला खोत व इतर मान्यवर..
पुनवत प्रतिनिधी
तालुक्यातील शाळांनी बदलत्या परिस्थिती नुसार शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास पटाची समस्या निर्माण होणार नाही असे मत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले . शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू दळवी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.आ. मानसिंगराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख, तहसीलदार श्यामला खोत, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती .
गटशिक्षणाधिकारी अरविंद माने यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या चांगली आहे परंतु शाळांना अलीकडे पटाची समस्या भेडसावत आहे अशा परिस्थितीत शाळांनी शिक्षणाचा दर्जा सुधारला तर पटाची समस्या कमी होईल. आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. शिक्षण विभाग , प्राथमिक व माध्यमिक शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत .भविष्यात शिक्षणाच्या कामी अधिक लक्ष देणार आहे. तहसीलदार श्यामला खोत, गटविकास अधिकारी संतोष राऊत, माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांचीही प्रमुख मनोगते झाली.
तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वतीने शिक्षक सहदेव खोत, ईनुस मनेर, केंद्रप्रमुख डी. के.गोसावी , सायली दळवी, सारिका देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्या हस्ते विस्तार अधिकारी विष्णू दळवी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिक्षक अरुण पाटील, संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन तालुका शिक्षण विभाग, सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांनी केले.
यावेळी सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सांगली डायटचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई, पी बी दुर्गुळे, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख डॉ. सुरेश माने , इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,प्रदीप सुर्वे, सतीश नवले, धनंजय थोरात, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .