भिलवडी प्रतिनिधी
अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या ,सेमी इंग्लिश स्कूल, भिलवडी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
संस्थेचे सचिव मानसिंग हाके,संचालक जयंत केळकर,संजयकदम,रोहित नलवडे,
विभागप्रमुख प्रा. सौ.मनिषा पाटील,प्राचार्य दिपक देशपांडे,प्रा.एम.आर.पाटील, यांनी विठठ्ल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केली.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे दिंडीत सहभागी झाले.त्यांनी शाळेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सर्वांनी मिळून विठ्ठलाचे टाळांच्या गजरात भजन म्हटले. भिलवडी शिक्षण संकुलातून पालखीसह वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. यावेळी सर्व मुले पारंपारिक वेशभूषेत आली होती. दिंडी मध्ये सर्वजण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत टाळ वाजवत नाचत होती. या निमित्ताने मुलांनी पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. दिंडी नंतर मुलांना शाळेकडून प्रसाद देण्यात आला. हा सर्व सोहळा प्रचंड उत्साहात व आनंदात पार पडला. खाजगी प्राथमिक चे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,शरद जाधव,प्रतिभा पवार,मानसी किणीकर, सुफिया पठाण, शिक्षक वृंद व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.