भिलवडी प्रतिनिधी
अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या,इंग्लिश मिडियम प्रायमरी ॲड हायस्कूल,भिलवडी या विद्यालयाचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,गिरीश चितळे,सौ.लीना चितळे,सचिव मानसिंग हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
साहित्यिक सुभाष कवडे व भू. ना. मगदूम यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मोबाईलच्या दुनियेतून विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन पुस्तकांचे वाचन करावे या हेतुने भराविलेल्या पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
ज्युनिअर के.जी. ते चौथीच्या विदयार्थ्यांना "जादूचे खेळ" दाखवण्यात आले.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'उबुंटू ' हा शैक्षणिक जीवनाशी निगडीत असलेला बालचित्रपट दाखवण्यात आला. शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा 'डॉक्युमेंटरी' रुपात दाखवण्यात आला. इयत्ता नववीतील विदयार्थी- विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या 'बुकलेटचे' उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी सादर केलेल्या हास्ययात्रा हा विनोदी एकपात्री कार्यक्रमास पालकांनी प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख के. डी.पाटील,महावीर शेडबाळे,बाबासाहेब चितळेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक संजय मोरे, प्रा.महेश पाटील,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,स्मिता माने, शिक्षक,सेवक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.