Sanvad News पलूसकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात

पलूसकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात


पलूस प्रतिनिधी 
पंडित दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा ,विद्यालयाचे मुख्याध्यापक.टी.जे.करांडे ,जेष्ट शिक्षक  ए.के.बामणे , व्ही.एस.गुरव ,ए.जे.सावंत ,सौ.एस.बी.कोळी ,सौ.पी.व्ही. नरुले ,सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.
   सुञसंचालन कु. आदिती सूर्यवंशी ,संचिता सूर्यवंशी ,रेणू भोसले ,प्राजक्ता पाटील, योगिता सिसाळ हर्षली माळी यांनी केले यांनी अतिशय नेटके सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने अतिशय सुंदर नियोजन केले.सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांचा दहावी ब च्या वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला   शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे  ,सर्व संचालक यांनी सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
To Top