भिलवडी
बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या मराठी व इतिहास विभागाच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कै. डॉ. चंद्राताई शेणीलीकर यांच्या २८ व्या स्मृती दिनानिमित खुल्या वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश पटकाविले.
प्रथम क्रमांक - संकेत कृष्णा पाटील (शिवराज महाविद्यालय , गडहिग्लज जि. कोल्हापूर),
व्दितीय क्रमांक - कु.सुफीया इस्माईल नायकवडी (विश्वासराव नाईक कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , शिराळा), तृतीय क्रमांक - कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर. ( मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली)
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक -
हौसेराव सजेराव हुबाले,
द्वितीय विठ्ठल दतात्रय जगताप(छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) यांनी प्राप्त केला.
डॉ.तातोबा बदामे,प्रा.शिवाजी कुकडे यांनी परीक्षण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे अध्यक्षस्थानी होते.
डॉ.सुरेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. डी.पी. खराडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रा.ए.एन. केंगार मानले.डी.आर. कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.