हरिपूर प्रतिनिधी
येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ, सांगली यांच्यावतीने इयत्ता नववी- दहावीच्या गरीब, गरजू ,होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रोटीचे अध्यक्ष सीए सलील लिमये, रोटरियन समीर गाडगीळ (व्होकेशनल डायरेक्टर), रोटेरियन मनीष मराठे, सुधा कुलकर्णी (कम्युनिटी डायरेक्टर) ,चिदंबर मगदूम, अमित चोरडिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार हे होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समीर लिमये म्हणाले,'शिक्षण ही एक शक्ती आहे.शिक्षणातून आपण आपल्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल करू शकतो. प्रगती करू शकतो .यशाची अनेक शिखरे पदाक्रांत करू शकतो. हे सामर्थ्य शिक्षणात आहे. शिकून स्वतःचाही विकास करा आणि समाजालाही हातभार लावा."
प्रास्ताविक विठ्ठल मोहिते यांनी केले .आभार राजकुमार हेरले यांनी मानले.