Sanvad News क्लेरमाॅन्ट इंटरनॅशनल स्कूलच्या ६ खेळाडूंची उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.

क्लेरमाॅन्ट इंटरनॅशनल स्कूलच्या ६ खेळाडूंची उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.

   

आष्टा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जत येथील क्रीडा संकुल मध्ये जिल्हा स्पर्धा व निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये क्लेरमाॅन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टा मधील १७ वर्षाखालील ३ मुले व ३ मुली यांनी घवघवीत यश मिळवले. 
उस्मानाबाद येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या सहा खेळाडूंची निवड झाली आहे. मुलांच्या संघामध्ये आर्य माने,वरद चौगुले, आदित्य कुकडे तर मुलींच्या संघामध्ये सई तोडकर, श्रावणी खबिले व प्रियांशी फडतरे यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेश चौगुले, मुख्याध्यापक श्री. चंदनगौडा माळीपाटील,  क्रीडाशिक्षक श्री. अजित सूर्यवंशी व श्री.प्रतिक इंगवले तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आमदार विक्रम सिंह सावंत सचिव श्री.विजय बिराजदार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व सर्व पालक या सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले.


To Top