Sanvad News मदरसा हजरत अली बिन अबी तालिब(रजि) पलूस संस्थेच्या डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न.

मदरसा हजरत अली बिन अबी तालिब(रजि) पलूस संस्थेच्या डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न.


मदरसा हजरत अली बिन अबी तालिब(रजि) पलूस संस्थेच्या डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस संकुलात ७६ वा भारतीय स्वातंत्र्य  दिन सोहळा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ध्वजारोहण संस्थेचे हितचिंतक व उद्योजक नसीर मुल्ला रामानंदनगर यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये  सर्व विद्यार्थ्यांनी ध्वजगीत, महाराष्ट्र गीत,समूहगीत, गायन व प्रबोधनपर नाटकाने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नाजीम हाजी कारी बदीउज्जमा साहब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नसीर भाई मुल्ला रामानंदनगर, हाफीज अय्याज साहब तासगांव , बालगंधर्व विद्यालय नागठाणे चे माजी मुख्याध्यापक डी. एन.माने सर,उद्योजक रमजान भाई शेख मिस्त्री सांडगेवाडी , हाजी गफूरभाई मुल्ला बांबवडे,जहाँगीर भाई मुल्ला बांबवडे , रोहीत माने विसापूर हे उपस्थित होते.



यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी कारी बदिउज्जमा साहेब म्हणाले कि जे लोक आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण ठेवतात तेच लोक खऱ्या अर्थाने जागृत समजले जातात.पुढे ते म्हणाले कि आजच्या तरुण पिढीने निर्व्यसनी  राहिले पाहिजे,मोबाईल च्या अतिवापर पासून दूर राहिले पाहिजे.      
         सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अलीम शेख सर,अरबी नाझीम तालीमात कारी जरीफ साहब,मुफ्ती मोहम्मद साहब,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर  कर्मचारी,अरबी शिक्षक, विद्यार्थी ,पालक,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संस्थेतर्फे  ड्रेस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन आसिफ जमादार सर यांनी केले तर आभार आरिफ लतीफ सर यांनी मानले.
To Top