Sanvad News पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल पलूस चे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यश

पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल पलूस चे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यश



पलूस प्रतिनिधी
पलूस मदरसा  डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल पलूस च्या विद्यार्थ्यांनी 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटात पलूस तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला .क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ल.कि . विद्यामंदिर पलूस येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नियोजन करण्यात आले .सदर स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल पलूस च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला .या तालुका स्पर्धेत तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून एकूण 12 संघ सहभागी झाले होते.तसेच 17 वर्षे वयोगटात देखील द्वितीय क्रमांक पटकाविला.या गटात एकूण 16 संघ सहभागी झाले होते.दोन्ही अंतिम सामने अतिशय चुरशीचे झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मदरसा नाजीम कारी बदिउज्जमा साहब,प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर ,सर्व शिक्षक,उस्ताद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक बी.एम.नदाफ सर,आरिफ लतीफ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


To Top