भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवनिमित्त मे.अनिल जाधव कन्स्ट्रक्शन सांगलीचे कॉन्ट्रॅक्टर अनिल जाधव यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली.जाधव यांनी रकमेचा धनादेश भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांचेकडे सपूर्द केला.
जाधव परिवारातील गेल्या तीन पिढ्या बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत.विश्वास चितळे यांचे हस्ते बुके देऊन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी या जाधव यांनी दिलेल्या या देणगी बद्दल भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले.सुप्रसिद्ध आर्किटेक्चर गाडगीळ यांनी देखील भिलवडी शिक्षण संस्थेच्या विविध वस्तू उभारणीत मोठे योगदान दिले असल्याबद्दल त्यांचे ही ऋण व्यक्त केले.
यावेळी अनिल जाधव,इंजि. राकेश जाधव, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे,जयंत केळकर, सचिव मानसिंग हाके, सहसचिव के.डी. पाटील, प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे, उपमुख्याध्यापक विजय तेली, मुख्याध्यापिका विद्या टोणपे,आजीव सदस्या प्रा. सौ.मनिषा पाटील, मुख्याध्यापक सुकमार किणीकर, तुषार पवार, मुबारक सर आदी उपस्थित होते.
फोटो - अनिल जाधव यांनी देणगीचा धनादेश विश्वास चितळे यांच्या कडे सुफूर्द केला.यावेळी गिरीश चितळे, डॉ.बाळासाहेब चोपडे,मानसिंग हाके आदी.