सांगली प्रतिनिधी
शिक्षकांची अशैक्षणिक कमातून मुक्तता करा त्यांना शिकवू द्या या मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळ्या फीती शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे आवाहन ल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (खाजगी प्राथमिक)चेपुणेविभागीय अध्यक्ष बाळासाहेब
कटारे यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शिक्षक बंधू-भगिनींना विनंती करण्यात येते की सध्या राष्ट्रीय कामाच्या नावाखाली आपणास अनेक कामे लावली जात आहेत. खरंतर शिक्षकांना अध्यापन सोडुन इतर कोणतही अशैक्षणिक काम सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे. आज पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षका कडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (खाजगी प्राथमिक )संघटनेच्यावतीने दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व शिक्षक* शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करणेचे आहे..
५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो. म्हणजे या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो. या दिवशी आपले विद्यार्थी ही आपली शाळेत येण्याची वाट पहात असतात कारण ते आपला या दिवसी सन्मान व गौरव करत असतात म्हणून आपण या दिवशी शाळेत असणे गरजेचेच आहे. शाळेत उपस्थित राहुन ही आपल्या भावना आपला असंतोष काळ्या फीती लावून व्यक्त करणेचे आहे.
अगदी त्याच पद्धतीने आपण ५ सप्टेंबर २०२३ रोजी शाळेत उस्थित राहून काळ्या फीती लावून शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावत असल्याबाबत निषेध करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
बाळासाहेब कटारे(पुणे विभागीय अध्यक्ष),बाळासाहेब बुरुटे (उपाध्यक्ष), संतोष जाधव (कोषाध्यक्ष)
उदयसिंह भोसले (मनपा अध्यक्ष) राजाराम व्हनखंडे (कार्याध्यक्ष)सौ. संगिता पाटील ( महिला जिल्हाध्यक्ष),सौ.संगिता पाटील(महिला प्रमूख इस्लामपूर) शरद जाधव ( पलूस / कडेगांव तालुका अध्यक्ष)भगवान पाटील (शिराळा तालुका अध्यक्ष)दत्तात्रय डफळे (वाळवा तालुका अध्यक्ष)योगेश मेटकरी(खानापूर आटपाडी तालुका अध्यक्ष)राजू कोळी( जत तालुका अध्यक्ष) भाऊसाहेब भोसले(कवठेमंहकाळ तालुका अध्यक्ष),अनिल उमराणी(मिरज तालुका अध्यक्ष)आदींनी आवाहन केले आहे.