Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनने सैनिकी शिस्ती सोबतच,संस्कारक्षम विद्यार्थी घडविले - प्रा.सर्जेराव खरात;सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत रक्षाबंधन उत्साहात संपन्न

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनने सैनिकी शिस्ती सोबतच,संस्कारक्षम विद्यार्थी घडविले - प्रा.सर्जेराव खरात;सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत रक्षाबंधन उत्साहात संपन्न


भिलवडी प्रतिनिधी
सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता. पलूस या विद्यालयात निवासी संकुला मधील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वक्ते प्रा. सर्जेराव खरात (प्रतिनिधी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुंडल) होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रमेश हजारे होते.
यावेळी बोलताना प्रा.सर्जेराव खरात म्हणाले की,भौतिक सुविधा वाढतील तसा माणूस माणसापासून दुरावत चालला आहे.जुन्या पिढीतील लोकांनी नाती जोपासली, ती टिकवली.क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनने आपुलकीच्या भावनेने सैनिकी शिस्ती सोबतच,संस्कारक्षम विद्यार्थी घडविले.यावेळी त्यांनी विविध किस्से,छोट्या मोठ्या कथांच्या माध्यमातून उपस्थित रसिकांना खळखळून हसविले.


भावा बहीणीचे नाते महत्वाचे असून त्यातील मायेचा ओलावा टिकविण्यासाठी कायमस्वरूपी कटिबध्द राहावे. प्रतिपादन रमेश हजारे यांनी केले.शिक्षिका स्नेहलता जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष सुनील बापू जाधव, कार्यवाह सौ. वनिता जाधव, बी.पी. जाधव, आनंदा उतळे,लेखक रवि राजमाने, पी.आर.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्या स्वाती पाटील यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापिका दिपाली जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री देशमुख व आश्र्विनी झेंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या भगिनींनी औक्षण करून राख्या बांधल्या.उपस्थित बहीण भावांनी विद्यालयाने आयोजित विविध फनी गेम्सचा आनंद लुटला. आकर्षक भेटवस्तू देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.विद्यार्थी व शिक्षकांनी कराओके गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.



To Top