Sanvad News पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल पलूस येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न



 पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल पलूस येथे पलूस तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हाजी कारी बदिउज्जमा साहब यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नसिर भाई मुल्ला किर्लोस्करवाडी,हाफिज अय्याज मोमीन तासगाव,नॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनी पुणे चे फिरोज भाई शेख,आसिफ भाई शेख पुणे,पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे सर, डॉक्टर सरनाईक पलूस सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक हे उपस्थित होते.


सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले.सदर स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात 25 संघ,17 वर्षाखालील गटात 27 संघ तर 19 वर्षाखालील गटात 4 संघ  सहभागी झाले होते 14 वर्षे खालील गटात लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस,17 वर्षाखालील गटात प्रतिनिधी हायस्कूल कुंडल व 19 वर्षाखालील गटात प्रतिनिधी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुंडल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.प्रोत्साहन पर नवीन उपक्रम म्हणून प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस 50 रुपये तर अंतिम सामन्यातील विजेत्या संघास 501 रुपये संस्था शाळा तर्फे बक्षीस म्हणून देण्यात आले.


सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे नाजीम हाजी कारी बदिउज्जमा  यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशालेचे मुख्याध्यापक आलीम शेख सर ,क्रीडा शिक्षक बी.एम.नदाफ सर ,आरिफ लतीफ सर,समीर आगा सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच लकी विद्यामंदिर पलूस चे जितेंद्र पाटील सर,एस.आर.कुंभार सर,सांगली जिल्हा कबड्डी असोशिएशन चे पंच आलम मुजावर,झाकीर शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व क्रीडा शिक्षक व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.या स्पर्धेसाठी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.एस.डी.सावंत सर,शशिकांत साबळे सर,शिंदे सर,गणेश यादव सर,संतोष साळुंखे सर,अमोल जगताप या सर्व पंचांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली.अशा रीतीने सर्व स्पर्धा विना तक्रार पार पडल्या.


To Top