Sanvad News शिक्षक बँकेमुळे होत असलेली सभासदांची भरभराट विरोधकांच्या पचनी पडेना - अविनाश गुरव ; हलगी नाद आंदोलन अपयशी ठरणार

शिक्षक बँकेमुळे होत असलेली सभासदांची भरभराट विरोधकांच्या पचनी पडेना - अविनाश गुरव ; हलगी नाद आंदोलन अपयशी ठरणार


सांगली प्रतिनिधी
शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षक सभासदांची होणारी भरभराट विरोधकांना पचनी पडत नसून,शिक्षक बँकेचा विकासरथ वेगाने असाच दौडत राहणार असून सभासदांमधून शिक्षक बँकेतील योजनांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. उद्याच्या हलगीनाद आंदोलनाला सामान्य सभासदाचा कोणताही पाठिंबा मिळणार नसून सदरचे आंदोलन १००% अपयशी ठरणार असल्याचा दावा प्राथमिक शिक्षक संघाचे सराचिटणीसअविनाश गुरव यांनी केला.
हलगी नाद करणाऱ्यांनी ..नाद करावा पण कुणाचा.. ? 
 सभासद हिताचा कारभार सुरु असून व्याजदर , लाभांश बरोबरच वचननाम्यातील ऐंशी टक्के पेक्षा अधिक वचनांची पूर्तता झाल्याने सभासद खूश आहेत. तेंव्हा विरोधकांनी आपले हसे करून घेऊ नये.२४ तारखेच्या सर्वसाधारण सभेसाठी विरोधकांनी शांततेचे सहकार्य करावे. त्यांनी विचारल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चेअरमन, व्हाय. चेअरमन व संचालक मंडळ निश्चित देतील. सभा पूर्णवेळ, पूर्ण ताकतीने चालवण्याची आमची मानसिकता आहे.यापूर्वी समितीच्या काळात सर्वसामान्य सभासदांना कारभाराबाबत प्रश्न विचारता येऊ नयेत म्हणून नेहमी उशिरा अहवाल पोहोच केले जायचे. ही प्रथा मोडून यावेळी आम्ही सात दिवस नव्हे तब्बल दहा दिवस अगोदर सर्व सभासदांना अहवाल पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून आपण काम केलेले आहे. आपण फक्त रबर स्टॅम्प अध्यक्ष म्हणून काम केले आहे.  जर आपणास शिक्षक बँक कळाली असेल तर अभ्यासूपणे प्रश्न विचारण्याचे आवाहनही अविनाश गुरव यांनी केले.शिक्षक बँक बचाव कृती समितीमध्ये असणाऱ्या संघटना जनाधार नसलेल्या कुचकामी संघटना असल्याचेही श्री गुरव यांनी यावेळी सांगितले.

बेदखल नेत्यांना स्वतःचीच पाठ थोपटून द्येण्याची  हौस..
कृती समितीचे प्रमुख म्हणून जे दोन नेते स्वतःची पाठ थोपटून घेत आहे त्यांनी केलेल्या आर्थिक गफल्यामुळे त्यांच्याच संघटनेने त्यांना बेदखल केलेले असून इतर अस्तित्वहीन संघटनांना सोबत घेऊन स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयोग कदापिही यशस्वी होणार नाही. सभासद त्यांना योग्य जागा दाखवतील.
To Top