Sanvad News शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची धनगांव मॉडेल स्कूलला भेट; सांगली जिल्ह्यात पेटी उघडा गुणवत्ता वाढवा कार्यक्रम

शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची धनगांव मॉडेल स्कूलला भेट; सांगली जिल्ह्यात पेटी उघडा गुणवत्ता वाढवा कार्यक्रम



भिलवडी प्रतिनिधी
पेटी उघडा गुणवत्ता वाढवा हा उपक्रम सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक मराठी शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळा धनगांवला भेट देऊन स्वतः विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
भाषा, गणित, इंग्लिश पेटीतील साहित्य मुले कसे वापरतात,अध्ययन कसे करतात  ते मुलांबरोबर बसून संवाद साधत अनुभवले. ग्रुप लर्निंग,संवाद साधला.


यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड म्हणाले की,शिक्षण सचिव रणजितसिंह देवल,शिक्षण आयुक्त सूरज मांडरे,प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी,कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे,मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शनिवारी दप्तराविना शाळेत शैक्षणिक साहित्याची पेटी उघडून त्याचा प्रत्यक्ष मुलांनी उपयोग करावयाचा आहे. साहित्याच्या  वापरमुळे मुलांमध्ये आंतरक्रिया घडून  विचाराला चालना मिळून संशोधक वृत्तीचा विकास होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडेल.साहित्य खराब होईल याची भीती बाळगून मुलांना साहित्यापासून वंचित ठेवू नका असे आवाहन ही त्यांनी शिक्षकांना केले.इयत्ता १ ली ते ७ वी वर्गाचे  मुलांचे वाचन,शालेय पोषण आहार योजना,विज्ञान व संगणक प्रयोगशाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी आमणापूर केंद्राचे केंद्रप्रमुख व धनगावचे सरपंच सतपाल  साळुंखे , शाळेचे मुख्याध्यापक  संजय डोंगरे , शिक्षक वृंद उपस्थित होते.


To Top