Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवा निमित्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवा निमित्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी



भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित इंग्लिश मिडीयम स्कूल भिलवडी येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पार पडले. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध विभागांमध्ये संस्थेमार्फत व विभागांमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत .यापैकी एक म्हणजे "विद्यार्थी आरोग्य तपासणी" हा होय. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे. व्यक्तीचे आरोग्य हीच खरी मोठी संपत्ती आहे हे ओळखून शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली  त्यामध्ये HB, CBC टेस्ट करण्यात आल्या. 


या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे उपस्थित होते. तसेच भिलवडी गावच्या सरपंच सौ.विद्या पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. सीमा शेटे संस्थेचे संचालक डॉ . सुनिल वाळवेकर, संजय कदम, संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सहसचिव व इंग्लिश मिडीयमचे विभाग प्रमुख के.डी.पाटील, बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच पलूस पंचायत समिती आरोग्य विभाग अधिकारी डॉ. सौ .रागिनी पवार , ग्रामीण रुग्णालय भिलवडीच्या डॉ. शेख मॅडम, जिल्हा परिषदेचे डॉ. झांबरे साहेब, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मगदूम, डॉ. अरिफ लतीफ, डॉ. रुपेश पाटील, डॉ. वैशाली खोत, फार्मासिस्ट योगेश कदम व त्यांचे सर्व आरोग्य सहाय्यक व सेवक उपस्थित होते. डॉ. रागिनी पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये आहारविषयक माहिती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


तसेच अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक संदेश देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कीर्ती चोपडे यांनी केले. प्रास्ताविक मानसिंग हाके , यांनी तर स्वागत सौ उज्वला हजारे व आभार के. डी. पाटील यांनी मानले. या नंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. इयत्ता ७वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे रक्त हे HB आणि CBC या तपासणी साठी घेण्यात आले. आजच्या पहिल्या टप्प्यात १३३ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.
To Top